
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
सांजेगाव परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपत काळे, माजी सभापती गोपाळ लहांगे, कचरू पाटील शिंदे, रामदास बाबा मालुंजकर, आदि जेष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले. लकीभाऊ गोवर्धने, योगेश शेलार, संतोष पवार, समाधान राजाराम गोवर्धने, सचिन खंडू गोवर्धने, समाधान विष्णू गोवर्धने, सचिन अशोक गोवर्धने, राहुल गायखे, अमोल कोकणे, संदीप कोकणे, अनिल कोकणे, आप्पा कोकणे, शांताराम शेलार, अमोल गोवर्धने, उत्तम गोवर्धने, योगेश गोवर्धने, राहुल गोवर्धने, दीपक शेजवळ आदी शेकडो युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका लक्षात घेता हा भव्य दिव्य प्रवेश सोहळा झाला. त्यामुळे आगामी काळात युवकांचे वर्चस्व मोठ्या प्रमणात राहील असे ॲड. संदीप गुळवे यांनी सांगितले.