इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयात १३० विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. मुंढेगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातही 15 ते 18 वर्ष वयोगटातील 55 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून पालकांचे प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्याचे आले.
कोरोनाची लस घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. याप्रसंगी मुकणे शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष अशोक राव, दिलीप धांडे, मुंढेगाव शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष भगवान गतीर, इतर सदस्य, पालकांनी लसीकरण यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
लसीकरण यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी संजय राव, प्रमोद गारे निलम पेढेकर यांनी साहाय्य केले. एमपीजी विद्यालय मुकणे आणि जय योगेश्वर विद्यालय मुंढेगाव यांच्या वतीने सर्व उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, प्रमुख पाहुणे, सर्व पालक, शिक्षक, शिक्षिका यांनी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुंढेगाव शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. जाधव, मुकणे शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी आभार मानले.