केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त आरपीआय कामगार आघाडीकडून शैक्षणिक साहित्य वाटप

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

गोरगरिबांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीचा सामना करत जिद्दीने अभ्यास करून गरिबांना न्याय मिळवून दिला.  विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करून त्यांच्या आदर्श विचारांची प्रेरणा घ्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार यांनी केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जन्मदिनाचौनिमित्ताने इगतपुरी तालुक्यात शालेय साहित्य वाटप करताना ते बोलत होते.

उत्तर महाराष्ट्र सचिव आरपीआय कामगार आघाडीचे संदीप निकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव येथील जनता विद्यालयात शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष हरिभाऊ गुळवे, भाऊसाहेब तांबे, भाऊसाहेब धोंगडे, मुख्याध्यापिका सुनीता जगताप, रवि  पवार, बाळासाहेब धोंगडे, शरद पवार, विशाल पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!