केपीजी महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन संपन्न

इयत्ता बारावीच्या विकास कोकाटे याने श्रीनिवास रामानुजन यांची काढलेली सुंदर रांगोळी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरी येथील जनता विद्यालयाचे प्राचार्य एम. आर. पाटील हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. जी. टी. सानप उपस्थित होते. याप्रसंगी प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी गणित दिनाचे महत्त्व विशद करून जीवनाच्या सर्व क्षेत्रात गणिताचे महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य एम. आर. पाटील व प्रा.।जी. टी. सानप यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. भाषण स्पर्धेत प्रशांत गाढवे याने प्रथम क्रमांक तर दामिनी शिरसाट हिने द्वितीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट रांगोळी सादरीकरणासाठी विकास कोकाटे याने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय गायत्री शिंगोटे यांनी केला. सूत्रसंचालन दामिनी शिरसाट यांनी केले.।आभार भाग्यश्री गायकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. एस. एम. पवार, प्रा. के. पी. बिरारी, डॉ. पी. एस. दुगजे, प्रा. जी. डब्ल्यू. गांगुर्डे, प्रा. बी. एम. निकम, प्रा. पी. जी. पूरकर व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!