वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समितीच्या गणाची निवडणूक स्वबळावर लढवणार : गोंदे दुमाला येथील महत्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

वंचित बहुजन आघाडीतर्फे इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समितीच्या गणांच्या सर्व जग लढवण्यात येणार आहे. ह्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी
स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक २०२२ ह्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण आढावा बैठक गोंदे दुमाला येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने ह्या बैठकीत झालेला निर्णय कार्यकर्त्यांनी एकमताने मंजूर केला. सर्वजण सोबत राहून वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी यावेळी सर्वांनी निर्धार केला.

महत्वपूर्ण बैठकीप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन दादा गायकवाड, नगरसेवक संजय साबळे, बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भारत बुकाणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, गोंदे दुमालाचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, जितेश शार्दुल, बाळासाहेब गांगुर्डे, नंदुभाऊ पगारे, मिलिंद शिंदे, विश्वनाथ भालेराव, बाळासाहेब जाधव, मधुकर बागुल, तानाजी सोनवणे, सचिन चोपडे, प्रकाश रूपवते, संदीप काकळीज, किशोर भडांगे, संतोष उबाळे, वंचित बहुजन आघाडी. नाशिक जिल्हा कमेटी, भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा व इगतपुरी तालुका, सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्हा व इगतपुरी तालुका आदींचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!