नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धा इगतपुरीत संपन्न

इगतपुरीनामा न्युज, दि. १२

विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपला शारीरिक व मानसिक क्षमतेचा विकास साधून खिलाडू वृत्ती आत्मसात करावी. यासह खेळामध्ये प्राविण्य मिळवून चांगले करिअर घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री. खातळे बोलत होते. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे , पोलीस उपनिरीक्षक राऊत, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, मविप्रचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील, नाशिक जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव डॉ. दीपक जुंद्रे, विजय कडलग, योगेश चांदवडकर, भाऊसाहेब धोंगडे, कृष्णा निकम, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.

भाऊसाहेब खातळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महाविद्यालयीन युवकांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन आपल्या परिसरासह महाविद्यालयाचे नाव लोकप्रिय केले पाहिजे याप्रसंगी अमोल वालझाडे, प्राचार्य डॉ. भाबड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एच. आर. वसावे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संचालक भाऊसाहेब खातळे व प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते करण्यात आला.  यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सोळा महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता. एचपीटी व आरवायके महाविद्यालय, नाशिक आणि बिटको कॉलेज नाशिकरोड यांच्यात अंतिम सामना होऊन एचपीटी महाविद्यालय विजेते ठरले. स्पर्धेला पंच म्हणून मंगेश मंडले, सौरभ महालकर, ऋषिकेश मराठे, निखिल कुरकुरे, भूषण भटाटे, स्वप्नील कर्पे यांनी काम पाहिले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी कांडेकर, प्रा. योगेंद्र पाटील,  प्रा. सुरेश कोकाटे, डॉ. अरविंद केदारे, डॉ. ज्ञानेश्वर गडाख, प्रा. जीवन मोहोळ, प्रा. महेश थेटे, प्रा. स्वप्नील कर्पे, प्रा. तेजस कुलकर्णी, प्रा. मिर्झा तोसिफ, प्रा. बी. बी. कोल्हे, प्रा. राकेश वडजे. प्रा. प्रविण अवघडे, राहुल पंडित, विनोद खारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!