हरसूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्माण दिनानिमित्त अभिवादन

राहुल बोरसे, इगतपुरीनामा न्यूज, दि ६

हरसूल येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित आंबेडकर नगर येथील अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपपूजन व धम्मवंदना करून ग्रामस्थांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांना उपसरपंच राहुल शार्दूल यांनी देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हुणुन हरसूल पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे होते. नितीन लाखन व तुकाराम कामडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पीएसआय दिलीप बोडके, उपसरपंच राहूल शार्दूल,मिथुन राऊत यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आनंद मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक धम्म वंदना घेण्यात झाली. यावेळी मिथुन राऊत, हिरामण गावित, दिलीप चौधरी, अंबादास माढी, बाबा शेंडे, योगेश आहेर, अशोक लांघे, भाऊराज धनगर, स्वप्नील शार्दूल, संदीप शार्दूल, शिवराम गावित, नितीन लाखन, आनंद मगर, रितेश गुणगुणे, केशव लांघे, प्रकाश लांघे, यासिन पिंजारी, खंडू शिंदे, बाळा सपकाळे अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघर्ष मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!