सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. १
मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि पॅटको प्रिसिजन कॉम्पोनंट्स प्रा. लि. अंबड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे मार्केटिंग प्रमुख पंकज करन व हर्ष जगझाप यांनी विद्यार्थ्यांना कंपनी व तेथील कामकाजाविषयीचे सखोल मार्गदर्शन करण्यात केले. यावेळी ६१ आजी-माजी विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी महाविद्यालयात दरवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते अशी माहिती दिली. यापुढेही आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मुलाखतींचे आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. शरद कांबळे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. मिलिंद थोरात यांच्यासह, प्रा. संदीप गोसावी, प्रा. मनोहर जोपळे, डॉ. अजित नगरकर, प्रा. भागवत महाले, प्रा. शाश्वती निरभवणे, प्रा. निलेश म्हरसाळे, प्रा. ऋषिकेश गोतरणे यांनी परिश्रम घेतले.