गोवर्धने महाविद्यालयाचे चौघे विद्यार्थी सैन्यदलात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल जाधव, किरण बऱ्हे, प्रदिप भोसले, अनिल भोसले या विद्यार्थ्याची निवड सैन्य दलात झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य  प्रा. देविदास गिरी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदींनी अभिनंदन केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना, प्लेसमेंट सेल, क्रीडा विभाग यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अध्यापन याबरोबरच नोकरी आणि व्यवसाय विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. एस.एस. परदेशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. जी. एस. लायरे, क्रीडा संचालक प्रा. एच.आर. वसावे, प्रा. पी. एस. फुलारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सैनदलात निवड झाल्याबद्धल विद्यार्थ्याचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. एस..एस. परदेशी, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. पी. एस. फुलारे आदी

Similar Posts

इगतपुरी तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात १०१ ठिकाणी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांसाठी देणार सुसज्ज ग्रंथालय : माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद सदस्या नयना गावित यांची संकल्पना

Leave a Reply

error: Content is protected !!