वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राची वाटचाल उद्दीष्ठपूर्तीकडे
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुंढेगाव परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी ह्या भागातील नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांमध्ये आरोग्याच्या प्रबोधनाचे सुद्धा काम केले जात आहे. अद्याप लसीकरण झालेले नाही अशा नागरिकांसाठी लसीचे दोन्ही डोस उपलब्ध असून नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांच्या कौशल्यदायी मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री घरटे, आरोग्य कर्मचारी संजय राव, आशा कार्यकर्ती राधा शेलार, निर्मला पोटकुले, कल्पना हंबीर, शारदा उबाळे, अनिता मुकणे, सरला धोंगडे, हिरा वारघडे यांचे पथक सक्रीयतेने कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. कार्यक्षेत्रातील मुंढेगाव, गरुडेश्वर, बळवतंवाडी, पाडळी देशमुख, मुकणे, शेनवड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य आरोग्य पथकाला मिळत आहे. लसीकरणाचे उद्दीष्ठ पूर्ण होण्याकडे वाटचाल करीत असून लवकरच उच्चांक पूर्ण करू अशी माहिती आरोग्य कर्मचारी संजय राव यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाची घर घर दस्तक मोहिमेद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. लसीकरण करणे अत्यावश्यक असून ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही अशा नागरिकांनी तातडीने लस घेणे आवश्यक आहे. जागरूक नागरिकांनी लसीकरणापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी पाठवावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री घरटे, आरोग्य कर्मचारी संजय राव यांनी केले आहे.