एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर किसन आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगेश मेंगाळ यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला.
ग्रामविकास साधण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक प्रयत्न करत आहोत. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव घाडगाचे नवनियुक्त उपसरपंच ज्ञानेश्वर आहेर यांना बिनविरोध संधी मिळाली आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही यापुढेही झपाटून काम करू.
- देविदास देवगिरे, लोकनियुक्त सरपंच
उपसरपंच निवडणूकप्रसंगी लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मेंगाळ, गुलाब जाधव, बहिरु घाडगे, ज्ञानेश्वर मधे, अंजना जोशी, सीमा देवगिरे, सत्यभामा मेंगाळ, आशा मधे, रोहिणी आहेर उपस्थित होते. ग्रामसेवक अमोल भामरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी साहाय्य केले. यावेळी राजू गोडे, अनिल घाडगे, धनंजय गोणके, रमेश देवगिरे, समाधान घाडगे, संतोष आहेर, महाराज जोशी, समाधान टोचे, संजय घाडगे, राहुल घाडगे, गोरख आहेर, गोकुळ देवगिरे ग्रामपंचायत कर्मचारी गंगाराम मोरे आदी ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत केले आहे.