इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
नाशिक मुंबई महामार्गावर कसारा बायपास बंधाऱ्याजवळ कंटेनर चालकाने पुढील चालणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीस जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कॉर्पिओ गाडी थांबली असता कंटेनर चालकाने घाबरून कंटेनर मधून उडी मारली. उडी मारताना त्याचा अंदाज चुकल्याने तो 40 फूट दरीत जाऊन पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आपत्ती व्यवस्थापन टीम रूट पेट्रोलिंग टीमने कसारा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.