जेष्ठ नेते कारभारी गीते यांचे निधन : इंजि. हरिभाऊ गीते यांना पितृशोक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील ज्येष्ठ नेते कारभारी चिमाजी गीते ( वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व. कारभारी गीते हे पहिले कर्म आणि धर्म शेती मानत होते. त्यानंतर ते शिक्षणासाठी आग्रही असायचे. त्यांची पहिली ओळख शेती अन् दुसरी ओळख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक अशी होती. प्रगतशिल टोमॅटो उत्पादक शेतकरी म्हणून नगर व नाशिक जिल्ह्यात त्यांची ख्याती होती. सरळसेवा प्रविष्ट वर्ग २ अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. हरिभाऊ गीते यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई, मुले प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गीते, संरक्षण मंत्रालयात कार्यरत असणारे लहानू गीते ( एल. के. ) व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि. हरिभाऊ गीते तसेच दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  स्व. कारभारी गीते यांच्या निधनाबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत प्रेमळ स्वभावाने ते परिचित होते. स्व. कारभारी गीते यांच्या निधनाने नाशिक नगर जिल्ह्यातील अभियंता संघटनासह सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

इगतपुरीनामातर्फे भावपूर्ण आदरांजली

Leave a Reply

error: Content is protected !!