नाशिककडून मुंबईला जाणारी वाहतूक अद्यापही विस्कळीत ; वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकेला फटका : घोटी सिन्नर महामार्ग सुद्धा झाला जाम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

घोटी टोलनाका परिसरात वाहतुकीची चांगलीच कोंडी वाढत आहे. नाशिक मुंबई महामार्गासह घोटी सिन्नर महामार्ग वाहतूक कोंडीत सापडला आहे. घोटी टोलनाक्यावर एका रुग्णवाहिकेलाही विस्कळीत वाहतुकीचा फटका बसला आहे. ही रुग्णवाहिका विस्कळीत वाहनांमुळे अडकली असल्याचे समजते. वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी नियोजन सुरू केले आहे. वाहतूक पोलिसांनी टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेस दिला मार्ग मोकळा करून दिला असला तरी वाहनांच्या रांगा लागल्याने त्यात अडथळा येत आहे. नाशिक मुंबई महामार्गाची नाशिक मुंबई लेन अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. तर मुंबई नाशिक लेन सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. घोटी सिन्नर महामार्गाची वाहतूकही धिम्या गतीने सुरू झाली असून वाहनधारक कंटाळले आहेत. 

Leave a Reply

error: Content is protected !!