इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने गावातील अनेक नागरिक बाहेरगावी स्थाईक झालेले असतात. अनेकांची वर्षानुवर्ष भेट होत नसते. गावातील सर्व भूमिपुत्रांची एकमेकांशी ओळख व्हावी. बाहेर गावी प्रत्येकाला एकमेकांना मदत व्हावी या उद्देशाने बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त गावात आलेल्या सर्व भूमिपुत्रांना एकत्र आणत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य देवेंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भदाणे, देविदास माळी, माजी सरपंच राजेंद्र मराठे, रतनपुराचे माजी सरपंच पोपट माळी, ग्रामपंचायत सदस्य भरत भदाणे, विनोद भदाणे, गुणवंत पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगत आयोजक बाळासाहेब भदाणे यांनी गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास प्रकियेत युवकांना सामावून घेणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासंबंधी बाहेरगावी गेलेल्यांच्या काही नाविन्यपूर्ण कल्पना किंवा सूचना असतील तर त्यांचा आदर करत सूचना अमलात आणल्या जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रत्येकाने आपली ओळख करून देतांना स्वतःचे व वडिलांचे नाव, कोणता व्यावसाय किंवा नोकरीचे ठिकाण, कोणत्या गावाला स्थायिक आहे? कशा पद्धतीने बाहेरगावी माझी प्रगती झाली? माझ्याकडून गावाला काय मदत होऊ शकेल? बोरकुंड रतनपुरा गावाच्या प्रगतीसाठी काय करता येईल? याविषयी प्रत्येकाने आपले विचार मांडले.
यावेळी बोरकुंड आणि रतनपुरा गावातील नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गावी गेलेले दीपक वसंतराव भदाणे ( नाशिक ), उमेश शालिग्राम भदाणे ( धुळे।), पिनाकेश्वर सुभाष भदाणे ( कल्याण ), युधिष्ठिर संभाजी भदाणे ( पुणे ), पंकज भदाणे ( मेरठ ), तुषार अंबुदास भदाणे ( पारोळा ), राजेश माधवराव भदाणे (औरंगाबाद।), प्रवीण खंडू वाघ ( चाळीसगाव ), चंद्रकांत खंडू वाघ ( नाशिक ), संजय रामदास वाघ ( कल्याण ), शिवाजी बापू बच्छाव ( नाशिक ), निलेश दिलीप भदाणे ( धुळे ),ज्ञानेश्वर हरिश्चंद्र देवरे ( पुणे ), प्रकाश सुरेश रोकडे ( नाशिक ),अशोक दगडू रोकडे ( नाशिक ) चेतन शांताराम नानकर ( पनवेल ), पियूष नामदेव नानकर ( पुणे ), वैभव गंगाधर वाघ ( पुणे ), पंकज आनंदा वाघ ( इंदोर ), एकनाथ संतोष माळी ( मुंबई ), अशोक सुरेश माळी ( नाशिक ), विकास देवराम एंडाइत ( नाशिक ),रोशन प्रभाकर महाजन ( पातोंडा ), कैलास बाबुराव वाघ ( पिंपळवाड ), शैलेंद्र विठ्ठल भदाणे ( गोंदिया ), सुनील जिजाबराव भदाणे ( नाशिक ),भूषण वाल्मीक बिरारी ( नांदगाव ), संदीप परशराम माळी ( नंदुरबार ), सोपान संतोष माळी ( डोंबिवली ), अशोक दयाराम शिंदे ( नाशिक ) योगेश सुभाष भदाणे (अहमदनगर ), प्रदीप भाईदास देवरे ( माणगाव-रायगड ) वाल्मीक बद्रीनारायण बागुल ( पिंपरी चिंचवड पुणे ), जयेश भटू साळुंखे ( नाशिक ), राहुल कृष्णा महाजन ( शहापूर ), सागर सावता माळी ( पुणे ), अमोल गंगाधर वाघ ( पुणे ), समाधान पांडुरंग माळी ( धुळे ), जितेंद्र सुरेश बोरसे ( नाशिक ), हंसराज आधार भदाणे ( जामनेर ) नगराज धोंडू देवरे ( पुणे ) अमोल शांतीलाल तावडे, सत्यवान नाना पाटील (नाशिक ), हेमंत धुडकु भदाणे ( नाशिक ), नरेश पंडितराव माळी ( धुळे ), राजेंद्र खंडू मराठे ( धुळे ), प्रवीण विजय भदाणे ( कळवण ), कमलेश जिजाबराव भदाणे ( नाशिक ), योगेश आनंदराव भदाणे ( सोनगीर ), श्याम प्रभाकर भदाणे ( जळगाव ), हिरालाल भिवसन वाघ ( नाशिक ), प्रशांत अशोक भदाणे ( धुळे ), श्याम विजय भदाणे ( धुळे ), मनोहर धर्मा अहिरे ( धुळे ), ज्ञानेश्वर साहेबराव सोनवणे ( औरंगाबाद ), पतिंगराव रावण भदाणे ( धुळे ), किशोर भदाणे ( धुळे ), समाधान आर. पाटील ( धुळे ), दिपक सुभाष पाटील (औरंगाबाद ),सुनिल सिताराम माळी ( नाशिक ) हजर होते. सूत्रसंचालन दीपक भदाणे ( नाशिक ) यांनी केले. यावेळी सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी चंद्रशेखर भदाणे, हंसराज भदाणे, संदीप भदाणे, देवेंद्र माळी, समाधान माळी यांनी परिश्रम घेतले.
बाळासाहेब भदाणे यांनी बोरकुंडची राजकिय सूत्र घेतल्यानंतर गावाचा मोठा कायापालट झाला असल्याचे अनेकांनी भाषणात सांगितले. कमी कालावधीत बोरकुंड गावाचा झपाट्याने विकास झाला. यामागचे रहस्य आम्हाला बाहेर गावी आम्हाला विचारले जाते. त्यावेळेस आम्ही आमची छाती गर्वाने फुलून जात असल्याचे सांगितले. एवढा मोठा विकास आणि एवढ्या लवकर कोणी केला याचे उत्तर देताना आम्ही गर्वाने बाळासाहेबांचे नाव घेतो. असे सांगत बाहेरगावी असलेल्या गावातील युवकांकडून काही मदत लागल्यास आम्ही ते कर्तव्य पार पाडू असे सांगितले. स्नेहमेळाव्यात “ना कोणी छोटा”,”ना कोणी मोठा” या तत्वाने गोल राऊंड करून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख अतिथींचा सत्कार किंवा गाजावाजा न करता कार्यक्रम संपन्न झाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला.
कमी वेळात नियोजन करूनही नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले युवक वर्ग मोठ्या संख्येने स्नेह मेळाव्यास सहभागी झाले होते. गावाच्या विकासासंदर्भात प्रत्येकाने मनोगत व्यक्त करत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावरून गावाविषयी प्रत्येक तरुणाला तळमळ दिसून आली. पुढील वर्षी बलिप्रतिपदेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाईल.
- बाळासाहेब भदाणे, लोकनियुक्त सरपंच बोरकुंड