कवी – भास्कर जाधव, दारणामाई गोट फार्म
मह्या इगतपुरी मंधी पूर्बी बी होत्या परबत रांगा,
राब राब राबून डोंगरात आरवून देत होत्या बांगा,
अन् आता म्हण सार डोंगर कंपनी,बिल्डरांनी कोरलय,
सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय??
मह्या इगतपुरी मंधी पूर्बि भी पडायचा लय पाऊस,
धरणं नव्हती तरी भागत व्हती तान,भूक अन् हौस,
अन् आता बक्कळ धरणखाली रब्बी आमचं गाडलय,
सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय??
पुर्बी म्हण भूमी मंधी या रामायण महाभारत घडलय,
टाकेद मंधी म्हण रावणान जटायुला मारलंय.
अन् सार घडून सनी जगात आमचं नाव कुठ दडलय,
सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय??
पुर्बी म्हणे खोऱ्यात आमच्या नव्हत वाट रस्त,
डोंगर दर्यातूनच गनिमाला राजे करायचे पुरे फस्त,
अन् सार जग जाया आज भगदाड उरालाच पाडलंय,
सांगा सांगा सरकार आमी तुमचं काय घोड मारलंय??
पुर्बी म्हण गुण्या गोइंदाने नांदत होती लेकर,
कामधंद नव्हत तरी मिळे म्हण कष्टाची भाजी भाकर.
अन् नव्हत धंद,धरणं,तरी आमा सह्याद्रीने तारलय,
सांगा सांगा सरकार आमी तुमच काय घोड मारलंय??
सांगा सांगा सरकार आमी तुमच काय घोड मारलंय??
संपर्क : 8669004649