राज्यातील ४५ हजार उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक क्रांती करणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलची सहविचार सभा संपन्न : शिक्षणगंगा प्रवाहित करणाऱ्या विविध उपक्रमांचे झाले उदघाटन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

महाराष्ट्र शिक्षक पॅनल व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून उभे राहिलेले विशाल कार्य महाराष्ट्रातील सर्व गुरुमाउलींच्या कौतुकास पात्र आहे. महाराष्ट्रातील निवडक गुरू माऊलींनी एकत्र येत व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवून आणल्याचा अभिमान वाटतो असे कौतुक कन्नडच्या शिक्षण विस्ताराधिकारी कल्पना पदकोंडे  यांनी केले. दरवर्षी दिवाळीत महाराष्ट्र शिक्षक पॅनलची शिक्षक सहविचार सभा पार पडते. यावर्षी खुलताबाद जि. औरंगाबाद येथे ही सभा घेण्यात आली. सहविचार सभेत महाराष्ट्रातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी नवनिर्मित उपयुक्त बाबींविषयी चर्चा झाली.

सहविचार सभेत लातूरचे सुरेश सुडे निर्मित Text for Speech व Math Worksheet, पिंपरी-चिंचवडचे संदीप वाघमोरे निर्मित ऑनलाइन गुरु ॲप, नाशिकचे पांडुरंग देवरे निर्मित ज्ञानकुंभ ॲप आणि मकरंद पुस्तक, अकोला येथील निवृत्ती राऊत संकलित लिखित छत्रपती शिवरायांचे परिचित अपरिचित मावळे, यशोदीप प्रकाशनचे यशोदीप जनरल नॉलेज मार्गदर्शिका तिसरी आवृत्ती, महात्मा फुले विद्यालय भोसरी, पुणे येथील मंगल आहेर गावडे, मकरंद आहेर यांचे 5 वी/8 वी शिष्यवृत्ती व सर्व स्पर्धा परीक्षा लेखन, लेखक ज्ञानेश्वर सोनटक्के, देवानंद डामरे यांचे ज्ञानांकुर प्रकाशन अमरावतीचे पुस्तक NMMS परीक्षा मार्गदशिका, खुलताबादचे सतिश कोळी लिखित माऊली प्रकाशनचे पुस्तक “बालकाच्या भावविश्वात”, नाशिकच्या कुंदा बच्छाव लिखित वैशाली प्रकाशन पुणे यांचे गोष्ट एका विमानवारीची..सत्यात उतरलेल्या स्वप्नाची..!! यांचे प्रकाशन, उदघाटन, शुभारंभ शिक्षण विस्ताराधिकारी कल्पना पदकोंडे यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणारे विविध उपक्रम शिक्षक, विद्यार्थी व समाजासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनल व्हॉटसॲप ग्रुप मार्फत सर्वात आधी महाराष्ट्रभर तंत्रज्ञान चळवळ सुरु झाली. 170 व्हॉटसॲप ग्रुप मार्फत महाराष्ट्रातील 45 हजार शिक्षकांना नियमित तंत्रज्ञान, शैक्षणिक माहिती, शैक्षणिक व्हिडीओ, विद्यार्थी पोर्टल ऑनलाईन माहिती आदी पोचवण्याचे काम अखंडित सुरू आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यासाठी नियमित अभ्यासक्रम आधारित व्हिडीओ, तज्ञांकडून गुगल मीट, झूम मिटिंगद्वारे मार्गदर्शन, ऑनलाईन चाचणी, टेकमोझो चाचणी आदी उपक्रम सुरु आहेत. शिक्षकांसाठी दरवर्षी २ दिवसीय शैक्षणिक संमेलन आयोजित करून महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. दिवाळीमध्ये ग्रुप मधील सक्रिय सदस्यांनी सहविचार सभा आयोजित करून शैक्षणिक दिशा ठरवण्यात आली. प्रास्ताविक सतीश कोळी, सूत्रसंचालन सतिश बोरखडे यांनी तर मनोहर गावडे यांनी आभार मानले. सहविचार सभेत दीपक चामे, सतीश कोळी, महाराष्ट्रातील गुरुमाऊली प्रमोद परदेशी, रंगनाथ सगर, गिरीश दारुंटे, सुरेश सुडे, विकी ऐलमटे, विजय गवळी, निवृत्ती राऊत, ज्ञानेश्वर बडगे, मनोहर गावडे, भास्कर राऊत, रेहमान पठाण, कुंदा बच्छाव, हेमलता भामरे, राजश्री पाटील, मेघराणी जोशी, सारिका अहिरे, सचिन पाटील, उबेद शेख,पांडुरंग देवरे, गजानन चौधरी, सचिन वावरकर, देवानंद डामरे, राजकुमार तिरभाने, ज्ञानेश्वर सोनटक्के, पंकज पालीवाल, देवेंद्र बोरसे, गुरुदत्त पुरी, प्रमिला सेनकुडे, रावसाहेब राऊळ, अशोक लाड, ज्ञानेश्वर देवरे, रामसिंग महाजन, मकरंद आहेर, संभाजी ठुबे, मनीषा पवाल, बाळासाहेब सातपुते, चंद्रकांत गोरगिळे, राम तळपे, दीपक सहाणे आदींसह महाराष्ट्रातील शिक्षक पॅनलचे १५० ग्रुप सदस्य उपस्थित होते. ( बातमी संकलन : प्रमोद परदेशी )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!