
शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
ईद इ मिलाद दुन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर खेर उमाह ट्रस्टच्या वतीने नांदडगाव येथील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ज्या परिवाराच्या कुटुंब प्रमुखाचा कोरोनाच्या महामारीत मृत्यू झाला त्या कुटुंबातील महिलांना ग्रामपंचायत सदस्य उमेश खातळे यांच्या मार्गदर्शनाखाली मशीन वाटप करण्यात आल्या. यावेळी गावातील मारुती मंदिर व परिसरात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक बसवण्यात आले.
महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी शिलाई मशीनमुळे चांगला हातभार लागणार असून ह्या उपक्रमामुळे महिलांनी ट्रस्टचे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी खैर उम्माह ट्रस्टचे अध्यक्ष खान इम्रान दाऊद, उपाध्यक्ष खान एजाज अफजल, सचिव शेख इम्रान खलील, खजिनदार सय्यद मुज्जफर अली, सदस्य जावेद सिद्दीकी, अविनाश कासार, तुषार वळकंदे, सय्यद तनवीर, खान फिरोज, सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद आदी उपस्थित होते.
