मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील तर महानगरप्रमुखपदी हिरामण चव्हाण : नूतन जिल्हा कार्यकारीणीला नियुक्तीपत्र प्रदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आदेशानुसार आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार
जळगाव येथे झालेल्या बैठकीत मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील तर महानगरप्रमुखपदी हिरामण हरीभाऊ चव्हाण यांची निवड झाली. जिजाऊ पूजनाने बैठकीस सुरुवात झाली. जिजाऊ वंदना गायन ग. स. संचालिका कल्पना पाटील यांनी केले. मराठा सेवा संघ राज्य केंद्रीय कार्यकारिणी सूचनेनुसार जळगाव जिल्हा नुतन कार्यकारिणी निवडीसाठी केंद्रीय निवड समिती गठीत  करण्यात आली होती. या समितीत अध्यक्ष डॉ. प्राचार्य रामकिसन पवार, मराठा सेवा संघ नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, औरंगाबाद येथील दीपक पवार यांचा समावेश होता.

बैठकीत मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी दिलेला काळ, केलेली कामे व उपक्रम व संघटनेची विचारधारा लक्षात घेता जळगाव जिल्हा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी अनिल पाटील तर जळगाव शहर महानगरप्रमुखपदी हिरामण हरीभाऊ चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी डॉ. रामकिसन पवार म्हणाले की, मराठा सेवा संघात कोणताही जातीभेद केला जात नाही. सर्वधर्म समभाव मानुन अनिष्ठ रूढी परंपरा, कर्मकांड, अंधश्रध्दा, ढोंगीपणाला येथे थारा दिला जात नाही. सत्यावर आधारित ज्ञान विज्ञान यावर समाजातील सर्व घटकांची सेवा सुरु आहे. नाशिक विभागीय अध्यक्ष व निवड समितीचे सदस्य दिपक भदाणे यांनी नुतन कार्यकारिणीने समाजातील बदल स्वीकारून योगदान द्यावे. जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करत संघटन बांधणी करावी असे आवाहन केले.

यावेळी माजी विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, जगदीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राम पवार, मराठा सेवा संघाचे प्रचारक दिनेश कदम यांना जिल्हा शाखेतर्फे जिजाऊ वंदना प्रतिमा भेट देत विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा पदाधिकारी निवडीत जिल्हा सचिवपदी संजय पाटील, सहसचिव संजय जप्ते, उपाध्यक्ष सुमित पाटील ( बोदवड ), जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत शेजोळे ( जळगाव ), जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील ( मुक्ताईनगर ), जिल्हा कोषाध्यक्ष अजय पाटील ( भुसावळ ), जिल्हा कार्याध्यक्ष
योगेश पाटील ( यावल ), जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पाटील ( जामनेर ), जिल्हा सहसचिव गिरीश पवार ( रावेर ),महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले, महानगर उपाध्यक्षपदी यु. जी. पाटील यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाला डॉ. अनिल पाटील, कल्पना दिलीप पाटील ( रावेर ), प्रा. जगदिश पाटील ( फैजपुर ),शैलेश पाटील ( भुसावळ ), मधुकर पाटील, सी. ए. पवार, प्रा. दीपक पवार, शरद पाटील, अमोल पाटील, गणेश देशमुख, मेघश्याम भदाणे, नरेंद्र पाटील, हिरामण चव्हाण, प्रदीप पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, समाधान पाटील, सतीश बोरसे, विजय देवरे, शैलेश पाटील, परमेश्वर सोनवणे आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र, बुके, जिजाऊ वंदना देऊन सन्मान करण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!