इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांचे कार्य व योगदान भरीव असून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य मार्गदर्शक व दिशादर्शक आहे . असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले.
इगतपुरीयेथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच वन्यजीव सप्ताह समारोप , आनंदतरंग फांऊडेशन व नेहरू युवा केंद्र आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धैच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी शाहीर उत्तम गायकर, वन परिक्षेत्र अधिकारी एच. आर. चौधरी, प्रा. डॉ. ए. ए. खलाणे, वनपाल एस. टी. मोटकरी, आर. के. अहिरे, एन. आर. सरवदे, के. के. शिंदे, व्ही. बी. पासलकर, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शिक्षणाची गंगा खेडया पाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांनी केलेले कार्य अविस्मरणिय असेच आहे. याप्रसंगी उत्तम गायकर यांनी कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. वन परिक्षेत्र अधिकारी एच. आर. चौधरी यांनी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागाने देशभक्तीपर गीते सादर केली. निबंध स्पधैतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वन्यजीव सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. आभार प्रा. यू. एन. सांगळे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. एल. डी. देढे , प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. आर. एम. आंबेकर, प्रा. डॉ. के. एम. वाजे, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. एस. के. शेळके, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. ए. एस. वाघ, प्रा. एस. एम. चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.