जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सादर झालेली आरोग्य विकास श्रेणी मंजूर : प्रदेशाध्यक्ष महेश जाधव यांनी मानले राज्य शासनाचे आभार

सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांनी सादर केलेली आरोग्य विकास श्रेणी अखेर शासनाने मंजूर केली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश जाधव यांनी याबाबत शासनाचे आभार मानले आहे. प्रदेशाध्यक्ष महेश जाधव यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संघटनेचे संस्थापक कै. द. स. अंदाने यांनी सादर केलेली डॉ. दोदवाड समितीने शिफारस केलेली आरोग्य विकास श्रेणी मंजूर झाली आहे.

शिवराज जाधव, वैष्णव, गवई, सपकाळे, अजय चौधरी यांनी अंशतः बदल करून पुनश्च सादर केलेली आरोग्य विकास श्रेणी म्हणजे अवैद्यकीय आरोग्य अधिकारीचा सेवा प्रवेश नियम, शैक्षणिक अहर्ता, प्रशिक्षण कालावधी, प्रस्ताव इत्यादी बाबी अखेर मान्य झाल्या आहेत. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाकडे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शिवराज जाधव, वैष्णव,  बालाजी सातपुते, मंगल पवार, आढाव, सुनील गायकवाड आणि केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी याबाबत पाठपुरावा करत होते.

आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आता आरोग्य पर्यवेक्षक मधून अवैद्यकीय आरोग्य अधिकारी हा पदोन्नती चॅनेल निर्माण झाला आहे. आरोग्य पर्यवेक्षकाचे पदनाम बदल राहून गेले आहे. अधिकारी वर्गाने वेळोवेळी चर्चा करताना ही मागणी कधीही मान्य केली नव्हती त्यासाठी वेतन त्रुटीच्या मागणी साठी संघटना लवकरच आंदोलन करणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे सचिव बाळासाहेब कोठुळे, राज्य संघटक बाळासाहेब ठाकरे, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय सोपे, सरचिटणीस सुभाष कंकरेज, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, प्रवीण पाटील, देवा बेंडकुळे, अमोल बागुल, किशोर अहिरे, वाल्मीक मोकळ आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!