पीक विम्या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक आणि माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची बैठक संपन्न

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

भाताच्या कोठरात गतवर्षी अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती उद्धवस्त केली होती. हाती आलेला घास वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. अस्मानी संकटाने भात शेती गतवर्षी पूर्णपणे वाया गेली होती. शासनाकडून भरपाई मिळेल या आशेने शेतकरी वाट बघून आहे. मात्र वर्ष उलटूनही पिकविम्याची रक्कम अजून मिळेना. या पार्श्वभूमीवर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या बैठकीला माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती पाटील जाधव, भारतीय एस्ट्रा कंपनीचे वर्मा, विमा कंपनीचे राहुल गायकवाड, नाशिक विभागीय कृषि संचालक विवेक सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ, तंत्र अधिकारी मयुरी चौरे, आत्माचे सहसंचालक हेमंत काळे, इगतपुरीचे तालुका कृषि अधिकारी शितलकुमार तंवर यांच्यासह रंगनाथ खातळे, दिगंबर पाटील, भास्कर खातळे, उपसरपंच जयराम गव्हाणे, गाेवर्धने आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!