निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत पिंपळगाव मोर लसीकरण सत्र पार पडले. याआधी झालेल्या सत्रांच्या तिप्पट तिप्पट प्रतिसाद लसीकरणाला मिळाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढला आहे. एकाच दिवशी पहिल्या व दुसऱ्या डोस एकूण ३८६ नागरिकांनी लसीकरण केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत एकाच दिवशी देवळे, बोरीचीवाडी, कांचनगाव, ठाकूरवाडी येथे लसीकरण सत्र घेण्यात आले. काळूस्ते येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. सोनाली कोळी यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, सटन लॉड्रीक यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी तब्बल ८१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बडगुजर, निखिल चित्ते, साळुंके, सागर दिंडे, गायत्री सोनवणे, आरोग्य सेविका विजया गुजर, भावना गायकवाड, मिलन पगारे, कुंदे, अनुसया गवळी, आरोग्य सेवक प्रदीप बच्छाव, रवी पाटील, उत्तम घोरपडे, दिलवरसिंग पराडके, संतोष लेकूळे, महेश गावित, आशा कर्मचारी सीमा तोकडे, वेणू घारे, शिला बेंडकोळी, सुरेखा तोकडे, मंदा नवले, क्षीरसागर, दुभाषे, वाहक गोरख बगाड, नितीन खडके, नितीन जाधव आदींनी शिबीर पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.