शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक : डॉ. भाबड : केपीजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करुन शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक चांगला आदर्श निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड बोलत होते. याप्रसंगी महेश श्रीश्रीमाळ, सागर हांडोरे, मनोहर घोडे, प्रदीपसिंग राजपूत, गणेश सुर्यवंशी, संपत डावखर, योगेश चांदवडकर, तुकाराम वारघडे आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे ते आपल्या पाल्यांना दर्जेदार  शिक्षण मिळण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याप्रसंगी महेश श्रीश्रीमाळ, सागर हांडोरे, मनोहर घोडे, विकास काजळे, प्रदीपसिंग राजपूत, प्रा. नेहा इनामदार, सुनिता झाडे, संपत डावखर, योगेश चांदवडकर, फरजिन शेख, तुकाराम वारघडे, राम शिंदे, महेश गव्हाणे, विष्णू डावखर, अपूर्वा कर्डक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.एस. एस. परदेशी यांनी केले.

कार्यक्रमाला नितीन शिंदे, रवींद्र डावखर, राहुल पंडित , गोटीराम चव्हाण, प्रा. शशिकांत रूपवते, संतोष माने, प्रा. प्रविण अवघडे, प्रतिक हरिनामे, गणेश सूर्यवंशी, प्रतिक्षा सूर्यवंशी, साधना खातळे, सखाराम खातळे, दत्तु लगड, शहाबाज शेख, दिनेश शाही, हिरामण दराणे, प्रविण नेटावटे, आरती भागवत, विजय घारे, घनश्याम जाधव, चेतन गतीर, सोमनाथ घारे, भूषण डामसे, दीपक गव्हाणे, मोहन आष्टेकर, सुरेश संधान, राजश्री चव्हाणके, भूषण वाघ, संदीप चव्हाण, पूजा आरोटे, आरती भागवत, शाम लहाणे, संतोष मोरे, विवेक कोकणे, महेश गतीर, शुभम जाधव, शशिकांत चव्हाण, मनोहर गवारी, महेश बोराडे, रिजवान शेख, अविनाश ठोंबरे, नरेश घारे, अतुल झनकर, रोहित दुर्गुडे, किरण मते, जयराम भटाटे, हिरामण दराणे, किरण गायकर, सागर होडे, विनय कोकणे, अक्षय भोर, श्वेता वाघमारे, संजीवनी खातळे, स्नेहल बऱ्हे, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. के. पी. बिरारी, प्रा.  डॉ. पी. एस. दुगजे, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. डी. के.भेरे, प्रा. व्ही. डी.  दामले, प्रा. सी. डी. चौधरी, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. ए. बी. धोंगडे, प्रा. एस. के. गव्हाणे, प्रा. अरुण वाघ यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!