वाडीवऱ्हे वीज मंडळ कार्यालयावर विविध मागण्यांसाठी किरण कातोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचा मोर्चा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गावात विजेच्या अनेक समस्या असून ह्या समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाडीवऱ्हे ग्रामस्थांच्या वतीने किरण रत्नाकर कातोरे यांनी दिला आहे.

वाडीवऱ्हे येथे विजेबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यानुसार ग्रामस्थांनी किरण रत्नाकर कातोरे यांच्या नेतृत्वाखाली वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ह्या मोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले. मोर्चाद्वारे महावितरण अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. पडलेले पोल नव्याने बसवावे, २०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवावेत आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. वीज मंडळ अधिकारी श्री. आगरकर यांनी येत्या १० दिवसात सर्व समस्या दूर करून वीजप्रवाह सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी किरण रत्नाकर कातोरे, पंडित कातोरे, दीपक भोर, वैभव कातोरे, विलास चोथे, बाळू बोऱ्हाडे, सरपंच रोहिदास कातोरे, प्रवीण मालुंजकर, गणपत शेजवळ, रोहिदास टिळे, गणेश मालुंजकर, रवी अस्वले, रोशन मालुंजकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!