ॲड. पांडुरंग काजळे यांची युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

शेतकरी कुटुंबातील नांदूरवैद्य येथील सुपुत्र ॲड. पांडुरंग गणपत काजळे यांची नुकतीच युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या  कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. आतापर्यंत निस्वार्थी भावनेने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायदेशीर कामाची पावतीच देण्यात आलेली आहे.

ॲड. काजळे हे परिसरातील शेतकरीवर्गाला शेतीविषयक असलेल्या कायद्याच्या समस्यासाठी कायम कायदेशीर मार्गदर्शन करत असतात. शेतीविषयक न्यायालयीन कामांमध्ये  मोफत सल्ला देखील देतात. त्यांनी आतापर्यंत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी जमातीच्या बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या प्रकरणामध्येही अनेक शेतकऱ्यांना भावनेने न्याय मिळवून दिलेला आहे. ह्या कामगिरीचे फळ म्हणून युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी  संघटनेवर त्यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!