इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती डावरे, कवी प्रा. संदीप जगताप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांताराम कोकणे, सदस्य बाळासाहेब वालझाडे, निवृत्ती जाधव, पांडुमामा शिंदे, बाळासाहेब गाढवे, पंढरीनाथ बऱ्हे, सागर बऱ्हे, जयंत गोवर्धने, विजय कडलग, रोहिदास उगले, किसन वाजे, वैशाली आडके आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती डावरे यांनी समाजदिनाच्या निमित्ताने कर्मवीरांच्या योगदानाचे स्मरण करणे आवश्यक असून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला. कवी प्रा. संदीप जगताप यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे वर्णन करुन ग्रामीण भागातील जीवनाचे वास्तव आपल्या भाषणातून श्रोत्यांसमोर मांडले. संचालक भाऊसाहेब खातळे, अशोक महाराज धांडे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ नागरिक किसन वाजे, खंडेराव भोर, गणपत राव, अशोक धांडे, संतू काळे, भगवंत वारूंगसे, गणपत सहाणे, बाबुराव खातळे, गणपत भगत, काळू कोकणे, राजाराम पाटील, आनंदा सहाणे, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले किरण फलटणकर, योगेश चांदवडकर, गोरख वाजे, कृष्णा निकम, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, महिन्द्रा कंपनीचे जयंत इंगळे, शिवांगी बिडकर, पंकज शिंदे, धोंडूपंत साखला, उत्तम गायकर, राजेंद्र गोवर्धने, सुनिल जाधव, संपत काळे, आकाश खारके, शिरसाट गुरुजी, शंकर कवठ, बी. डी. पाटील यांचा समाजदिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
आनंदतरंग फांऊडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धतील विजेत्यांना तसेच इयत्ता बारावी विज्ञान, कला, वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच समाज ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजगीत, स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर. एम. आंबेकर यांनी केले. आभार प्रा. एस. बी. फाकटकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.