महाराष्ट्र राज्यातील सहाय्यक अभियंता श्रेणी-1 अभियांत्रिकी अधिकारी संघटना यातील एक अभ्यासू, चिकित्सक, निष्ठावंत, माहितीचा सागर व सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे इंजि. सचिन चौधरी साहेब ! गेल्या पाच-सहा वर्षाच्या काळात साहेबांनी संघटनेच्या चळवळीला ज्या पद्धतीने वाहून घेतले होते. अहोरात्र संघटनेच्या सदस्यांच्या हिताचाच विचार करून जी मेहनत व कष्ट घेऊन संघटनेचे बळ वाढविले, ते सचिन चौधरी साहेब, आज आपल्यामध्ये नाहीत, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.
संघटनेचे बळ हे त्याच्या सदस्य संख्येवर असते, असे मानून मागील काळात त्यांच्या पुढाकारानेच या संघटनेची सदस्य संख्या दुपटीने वाढलेली दिसून येत आहे. या वर्षीची संघटनेची दैनंदिनी तयार करण्यासाठी देखील साहेबांचे बहुमुल्य योगदान लाभले होते. संघटनेमार्फत वेळोवेळी विविध स्तरावर पत्रव्यवहार करणे, पत्रव्यवहार करण्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करणे, माहितीचे वर्गीकरण करणे, संपुर्ण अभ्यासाअंतीच पत्रव्यवहार करणे, इत्यादी बाबींमध्ये चौधरी साहेब अतिशय हिरीरीने भाग घेऊन ती कामगिरी जबाबदारीने पार पाडत होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारे, मराठा सेवा संघाच्या मराठा आरक्षण समितीचे प्रमुख, उत्कृष्ट लेखक, अभ्यासक, वक्ते, शांत व संयमी व प्रसंगी आक्रमण होणारे अतिशय विनय व व्यासंगाने आपली बाजू मांडणारे, अंधारात असलेल्या महापुरुषांचे जीवन चरित्र आपल्या लेखणीतून प्रकाशात आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सचिन चौधरी साहेब ! प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास, चिकित्सक वृत्ती आणि पुढाकार घेऊन झोकून देऊन उत्साहात काम करण्याचा त्यांचा स्वभावगुण होता. निर्व्यसनी, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याचे दुःख शब्दातून वर्णन करणे कठीण आहे.
त्यांच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जे दुःख आलेले आहे, त्यात महाराष्ट्र राज्य सहाय्यक अभियंता श्रेणी-1 अभियांत्रिकी अधिकारी संघटनेचे सर्व सदस्य सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यांचे दुःखद निधनाने महाराष्ट्र अभियंत्रिकी अंधिकारी वर्ग १ संघटनेचे मार्गदर्शक डॉ. महेंद्र नाकिल, अध्यक्ष हरिभाऊ गिते, उपाध्यक्ष वाय. जी. पाटील यांचेसह प्रविण पाबळे, देवेंद्र सरोदे, दिलीप काळे, मंगेश पाटील, विनोद पाटील, मुकेश ठाकुर, संदिप पडांगळे, अमरसिंह पाटील, रजनी पाटील, ललितागौरी गिरी बुवा, कविता कुवर, कविजित पाटाल, बाळु सानप, सचिन गाणे, नवनाथ सोनवणे आदींसह संघटनेचे असंख्य सभासद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.