कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
७०८३२३४०२१ / ९४२१५११७३७
बेवडे म्हणती दारु,
कोण म्हणतं बियर !
दोन पेग पिल्यावर,
पडतो पहा गियर !!
दारु पायी नका म्हणू,
मी लागलो देशो धडी !
देशाची बसवतोय,
मी विस्कटलेली घडी !!
मरण झालंय स्वस्त,
दारु झालीया महाग !
देशाच्या जनतेसाठी,
मी करतो आहे त्याग !!
मला खंत नाही माझी,
नसे हो माझ्या घरची !
दारु पिता कर भरतो,
काळजी भारतीयांची !!
मी दारु पिलो म्हणून,
मज नका म्हणू वेडा !
कोरोनाच्या संकटाने,
मी झालो पहा बेवडा !!
अति दारु सेवनाने,
माझा जीव पहा गेला !
लोक म्हणतील बरा,
एकदा परचा मेला !!
चारच बेवडे मित्र,
रडती प्रेत पाहून !
म्हणतील दारु घष्टी,
प्यायची गेली राहुन !!
अंत्य यात्रेत माणसे,
असावी बरी तेवढी !
चार खांदेकरी मात्र,
असावी पक्की बेवडी !!
सरणावर द्या मला,
उशाशी दारु बाटली !
कवटी सोबत माझ्या,
दारु बाटली नटली !!
दारुपायी देह माझा,
गेला हो सरणावरी !
नशा मुक्ती करु सारे,
हीच शिकवण खरी !!
( कवी नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक असून नामवंत कवी आणि लेखक म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. )