इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
कोरोनावर विजय मिळवून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आज दुसऱ्या दिवशीही झपाट्याने वाढली आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णसंख्या सुद्धा कमी झाली असल्याचे आशादायक चित्र आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार आज एकाच दिवशी तब्बल 59 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ४३ व्यक्तींचा चाचणी अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर फक्त ३२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळली तर घाबरून न जाता जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी. कोरोनाचे निदान झाले तरी हा आजार बरा होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. अंगावर आजार काढल्यास जीवावर बेतू शकते. यासह शासनाच्या नियमांचेही पालन करावे असा सल्ला इगतपुरीचे प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रदीप बागल यांनी दिला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा गुणाकार झाला पाहिजे….एकाचे दोन…दोनाचे चार…चाराचे आठ….लसीकरणाची साखळी तोडु नका…तरच कोरोनाची साखळी तुटेल. सर्वांनी अवश्य लस घ्या. लस सुरक्षित आहे.
– इंजि. रूपांजली माळेकर, जिल्हा परिषद सदस्या हरसूल
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी प्रभावी
काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
– बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी