इगतपुरी तालुक्यासाठी मोफत घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धेचे आयोजन : मिळणार विविध आकर्षक बक्षिसे आणि सर्वांना मिळेल प्रमाणपत्र

इगतपुरीनामा न्यूज – my_ghoti_my_dreams ह्या इंस्टाग्राम पेजमार्फत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी तालुकास्तरीय घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धा २०२५ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा फक्त बक्षीसासाठी नसून आपली संस्कृती टिकवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्या गणपती बाप्पाच्या सजावटीचे आकर्षक असे २ फोटो किंवा व्हिडिओ 8010065715 या व्हाट्सअप नंबरवर  टाकायचे आहेत. तेच फोटो व व्हिडिओ इंस्टाग्रामला स्टोरी टाकून my_ghoti_my_dreams ला टॅग करायचे आहे. शिवाय यावर्षी हाताने मूर्ती बनवणाऱ्या स्पर्धकांना सुद्धा बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत तुम्ही पैठणी साडी, सन्मानचिन्ह , फॉर्मल शर्ट, लक्ष्मी गणेश पाऊले आणि रोख रक्कम जिंकू शकता. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७ ऑगस्ट पासून ७ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. ह्या स्पर्धेसाठी सहआयोजक म्हणून व्हीआयपी कलेक्शन घोटी, जेडी मोबाईल घोटी, मांडे दूध डेअरी घोटी, रिच क्वीन शॉप,एसआर कंट्रक्शन, बिल्डर अँड लँड  डेव्हलपर घोटी हे असणार आहेत. ही स्पर्धा मोफत असून फक्त इगतपुरी तालुक्यासाठी मर्यादित आहे.

error: Content is protected !!