
इगतपुरीनामा न्यूज – महिला व बालिका स्नेही आदर्श ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा आणि धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न झाले. यावेळी पिंपळगाव डुकरा गावातील महिलांना योगा प्रशिक्षण देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. गरोदर महिला व स्तनदा महिलांची आरोग्य तपासणी करून गृह भेटी देण्यात आल्या. या उपक्रमात सर्व महिला व किशोरवयीन मुली यांची आरोग्य तपासणी, रक्त व लघवी तपासणी अशा सर्व आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी हर्षाली मालविय, आरोग्यसेविका जयश्री गिरी, आरोग्य सेवक महेश वानझडे आरोग्य सेवक अनिल मिसाळ, आरोग्य निरीक्षक केदार ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर, अंगणवाडी सेविका व आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि उपस्थितांनी सहकार्य केले.