टाकेद यात्रेतील कायदा सुव्यवस्थेबद्धल घोटी पोलिसांचा राधाकिसन झनकर, रामदास गाढवे यांच्याकडून सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. घोटीचे पोलीस पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता. खा. राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली टाकेद गटातील महाविकास आघाडीचे राधाकिसन झनकर, व्यापारी सेल तालुकाध्यक्ष रामदास गाढवे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारे घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, अजय कौटे, पोलीस हवालदार श्रीकांत खैरे, सतीश शेलार, गुरुप्रसाद मोरे, योगेश यंदे आदींचा सत्कार केला. व्यापारी सेल तालुकाध्यक्ष रामदास गाढवे यांनीही पोलिसांचा सन्मान केला. याप्रसंगी भिका पानसरे, अरुण वाजे, बहिरू केवारे, दीपक झनकर कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षी सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते. यानिमित्ताने घोटी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो. यात्रौत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही तसेच शांतता राखणाऱ्या घोटी पोलिसांचा गौरव करणे महत्वाचे आहे असे राधाकिसन झनकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!