
इगतपुरीनामा न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मैनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर सीएमए इंटरमेडीएट परीक्षा घेतली जाते. यामध्ये नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सीएमए इंटरमेडीएट परीक्षेत ३० व २०२४ च्या अंतिम परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही उत्तम यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयएमआरटी हॉल नाशिक येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएमए अशोक पाटील, सचिन ब्राम्हणकर उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन सीएमए अमित जाधव यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सीएमए कोर्स केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या संधीबद्दल मार्गदर्शन केले. सचिन ब्राम्हणकर यांनी सीएमए कोर्स केल्यानंतर आवश्यक असणाऱ्या स्कील बद्दल मार्गदर्शन केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करतांना संस्थेने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, कोचिंगसाठी लाभलेल्या शिक्षकाचे आभार व्यक्त केले. काही विद्यार्थ्यानी ही पदवी मिळाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात झालेली प्रगती आणि मेहनतीने मिळवलेल्या शिक्षणाचा फायदा याबाबत सांगितले. कार्यक्रमाला सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, सीएमए रेखा सजनानी, सीएमए भगवान खांदवे, सीएमए सुरज लाहोटी, सीएस नयन देशमुख, हेमंत डुकले उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवयानी माळवटकर हिने तर आभार सीएमए आरिफखान मन्सुरी यांनी मानले. नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए अमित जाधव, उपाध्यक्ष सीएमए मयुर निकम, सचिव सीएमए प्रकाश राजपुत, खजिनदार सीएमए नवनाथ गांगुर्डे, सभासद सीएमए मैथिली मालपुरे, सीएमए धनंजय जाधव, सीएमए कैलास शिंदे, सीएमए संतोष ब्राम्हणकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करून शुभेच्छा दिल्या. सीएमए कोर्ससाठी नवीन प्रवेश सुरु झाले असून अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989/ 9423734900 | www.icmai.in | nasik@icmai.in येथे संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.