इगतपुरीनामा न्यूज – टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्त, घर घर संविधान उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान दिनाचे महत्व सांगत शाळेतील विद्यार्थ्यांनी यानिमित्त आयोजन करीत विद्यार्थ्यानीच सुत्रसंचलनापासुन तर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यात भुमिका पार पाडली. आपली मुलभुत हक्क आणि कर्तव्य, लोकशाही म्हणजे काय?, संविधान दिन का साजरा करण्यात केला जातो याप्रकारचे महत्व यावेळी सांगण्यात आले. संविधान दिनपर रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृतीपर रांगोळ्यांचे रेखाटन करण्यात आले. २६ / ११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका मंगला शार्दूल, आदर्श शिक्षक सिध्दार्थ सपकाळे, रामदास गंभीरे यांनी संविधान जनजागृतीविषयी माहिती सांगितली. राजकुमार गुंजाळ, प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, स्नेहल शिवदे आदी शिक्षक उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group