इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी अनुसूचित जमातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात एकूण ३०० मतदान केंद्र असून पुरुष १ लाख ४३ हजार ६१, स्त्रिया १ लाख ३७ हजार ४९३ आणि इतर ५ असे एकूण २ लाख ८० हजार ५५९ मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त आणि संवेदनशील केंद्रावर कमांडंट तैनात असतील. १५० मतदान केंद्रावर वेब कास्टिंग असून भारत निवडणुक आयोग त्याचे थेट प्रक्षेपण पाहणार आहे. सूक्ष्म निरीक्षक सुद्धा लक्ष ठेवणार आहे. ८५ जणांचे यापूर्वीच घरून मतदान करून घेतले आहे. दिव्यांग मतदारांसाठी हील चेअर पुरविण्यात आल्या असून आशासेविका नियुक्त करण्यात आलेल्या आहे. १२ भरारी पथक व ४ स्थिर सर्वेक्षण पथक कार्यान्वित असून बेकायदेशीर रोख रक्कम, मद्याचे वाटप, अवैध मार्गाने मतदारांना प्रलोभन करतील अशा अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीतील नाव शोधण्यास सहाय्य करणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, आवश्यक फर्निचर, वीज, स्वच्छता गृह, सावलीसाठी शेड, पाळणाघर, आदी सुविधांची पूर्तता करण्यात आलेली आहे.सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, आपले मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवण्याकरिता सहभाग नोंदवावा असे आवाहन इगतपुरी विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी ओमकार पवार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर, श्वेता संचेती यांनी केले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group