भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी अनुसूचित जमाती राखीव विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच मजा येणार आहे. महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, मनसेतर्फे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब शिवराम झोले, वंचित बहुजन आघाडीचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे डॉ. शरद तळपाडे यांच्यात आता लढत होईल असे स्पष्ट झाले आहे. प्रमुख लढत काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष निर्मला गावित यांच्यातच होणार आहे. ही लढाई सप्तरंगी दिसत असली तरी खऱ्या अर्थाने चौरंगी होणार आहे. विष्णू मंगा दोबाडे, वैभव विजय कुमार ठाकूर, नरेश यशवंत घारे, संदीप रघुनाथ जाधव, कावजी गंगाराम ठाकरे, रविंद्र तुकाराम भोये, वामन हिरामण खोसकर, अनिता रामदास घारे, जीवनकुमार परशराम भोये, किशोर अंबादास दगळे, नरेश यशवंत घारे, गोपाळ दगडू लहागे यांनी आज माघारीच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे यावर्षी ही निवडणूक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपल्याचे दिसतेय. प्रमुख पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठा पणाला लावुन लढायचे ठरवले आहे. ( याबाबत सविस्तर निवडणूक विश्लेषण उद्या इगतपुरीनामावर प्रकाशित होईल. )
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group