पायी हळूहळू चाला..मुखाने नरेंद्रनाथ बोला !! – इगतपुरी ते कावनई जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज पायी दिंडी सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर, मोहन महाराज कुलकर्णी यांनी गुरुमाऊली यांचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना समजून सांगितला. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगून त्यांनी उपस्थितांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या सत्संगानिमित्त सकाळी ८ वाजता गावातुन पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी भाविकांचे मन वेधून घेतले. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. १५०० भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाप्रसादानंतर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख कोंबडे मामा, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप देवरे, जिल्हा कर्नल लक्ष्मीकांत आडोळे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना गवळी, इगतपुरी तालुका रुग्णवाहीका निरीक्षक राजेंद्र उदावंत, तालुकाध्यक्ष देवराम राक्षे, महिलाध्यक्ष मनीषा गतीर, युवाप्रमुख तुषार घोरपडे, केशव तोकडे, भगवान घोरपडे, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ आगीवले, दत्तात्रय आडोळे, नागेश भुसे, संतोष महाराज थोरात सर्व तालुका कमिटी, सत्संग कमिटी हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!