इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाच्या इतर नियमांचे पालन आम्ही करतोच. पण कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याने आम्ही जास्त सुरक्षित झालो. आमच्या कुटुंबात आम्ही सर्वांनी लस घेतली. कोणतेही दुष्परिणाम नसल्याने लस सुरक्षित आहे. सध्याच्या काळात कोरोनापासून सर्वोत्तम संरक्षण मिळण्यासाठी कोरोना लसीकरणाशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया औचितवाडी येथील सुशीला कडू यांनी व्यक्त केली. इगतपुरी तालुक्यात हजारो लोकांनी लस घेतली असून ज्यांची लस घेणे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र काळुस्ते अंतर्गत कांचनगाव उपकेंद्र अंतर्गत औचितवाडी ह्या दुर्गम गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले. यावेळी येथील ग्रामस्थांनी पुढे येऊन लसीकरणाला साहाय्य केले. ह्या लसीकरण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. गावातील 45 वयोगटाच्या पुढील ग्रामस्थांनी स्वतःहून पुढे येत लस घेतली.
ग्रामस्थांसह शिक्षक, अंगणवाडी, कार्यकर्ती, मदतनीस, आशा आणि इतर फ्रंटलाईन वर्कर यांसह कोमोरब्रिड रुग्णांनी पहिला / दुसरा लसीचा डोस घेतला. काळुस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कोळी, डॉ. एन. पी. बडगुजर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साळुंके, आरोग्य पर्यवेक्षिका सटन लॉड्रीक, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, व्ही. डी. वैष्णव, आर. बी. पाटील, संतोष लेकुले, डी. जी. पराडके, पी. पी. बच्छाव, व्ही. जी. घारे, रुख्मिणी दुभाषे, शकुंतला क्षीरसागर, मंदा नवले, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी लसीकरण कार्यक्रमाला साहाय्य केले.