मुंढेगावजवळ २३ वर्षीय महिलेचा ३ वर्षीय बालिकेसह विहिरीत आढळला मृतदेह : बालिकेला वाचवतांना मायलेकीचा मृत्यू झाल्याची चर्चा

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या ३ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला आहे. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियंका नवनाथ दराणे वय २३, वेदश्री नवनाथ दराणे वय ३ असे दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. विहिरीला कठडा नसल्याने जवळ गेलेल्या बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली. यामध्ये दोघींचा मृत्यू झाला अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. मंगळवारी भावली धरणात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने इगतपुरी तालुक्यावर दुःखाचे सावट आहे.

Similar Posts

error: Content is protected !!