इगतपुरीनामा न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये संपुर्ण जिल्ह्यात सत्वर कारवाई सुरु आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतुक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहेत. त्यानुसार आज गुजरात राज्य परिवहन महामंडळ (GSRTC), नाशिक सुरत बस क्र. GJ-18 – Z – 8970 या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्थागुशा पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचुन गुजरात राज्यात जात असलेली ही बस थांबवुन तपासणी केली. त्यामध्ये १ लाख १४ हजार ६३५ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आलेला आहे. ह्या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुरनं १३८ / २०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्यात विजय विनोद बलसार, वय ५२ वर्षे, रा. सुरत (बस चालक), अमृतभाई भुवनभाई पटेल, वय ५६ वर्षे, रा. सुरत (बस कन्डक्टर) या संशयित आरोपींवर हा गुन्हा दाखल झाला आहे. ह्या गुन्ह्यातील पुढील तपासात किस्मत ब्रॅन्डी शॉप, पंचवटी, नाशिक यांचे मालक, अवैध मद्यसाठ्याच्या वाहतुकीस मदत करणारे इसमांना पाहिजे असलेल्या आरोपीत दर्शविण्यात आले आहे. अशा पध्दतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक / मालक अवैधरित्या मद्याची विक्री, तस्करी करीत असल्यास त्याच्याबाबत अधिक माहिती घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांचे मदतीने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा प्रविण सानप, किशोर खराटे, पोकॉ जाधव, बोडके, मोरे यांच्या पथकाने केली आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group