इगतपुरीनामा न्यूज – घोटी टोलनाका येथे अवैध प्रकारे विदेशी मद्य वाहतुक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करत लाखो रुपयांचा विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करून घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी घोटी पोलीसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. हा मद्यसाठा चारचाकी वाहनाने गुजरातमधील सुरतकडे तस्करी करण्यात येत होता. वाहनातील छुप्या कप्प्यात विदेशी मद्यसाठा लपवून तस्करी करण्यात येत होती. याबाबत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांनी कसून तपास सुरु केला आहे. विदेशी मद्याची चोरटी वाहतुक होत असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे व पोलीस पथकामार्फत टोलनाक्यावर सापळा लावण्यात आला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास महिंद्रा कंपनीची मोराझो कार क्रमांक GJ 05 RW 0254 ची तपासणी केल्यावर कारमध्ये १ लाख ८ हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी मद्याच्या व्हिस्कीच्या बाटल्या अवैधरित्या वाहतुक करतांना आढळून आल्या. याबाबत पोलीस सतीश चव्हाण यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. कार चालक किरीट हरीलाल बारैय्या, रा. सुरत, गुजरात याला अटक करण्यात आली असून १ लाख ८ हजार रुपये विदेशी मद्यासह १२ लाखाची कार असा एकुण १३ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group