खळबळजनक ! बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणी ठार ; इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील ही दुर्दैवी तरुणी आहे. या घटनेमुळे ह्या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मीनाक्षी शिवराम झुगरे वय ३१ असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही तरुणी बाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ह्या भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक मदत द्यावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे. दरम्यान वन विभागाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!