शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक समाधान गवते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गोंदे दुमाला येथील दीपिका नाठे, धामणी येथील रंजना लाड यांनी कालच राजीनामा दिला आहे. आरक्षण आंदोलनाचे लोन तालुक्यात पसरत असून अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मूक मोर्चा, साखळी उपोषण अशी आंदोलने सुरु करण्यात येत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाडीवऱ्हे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक समाधान सुकदेव गवते यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संचालक पदाचा राजीनामा चेअरमन हिरामण कातोरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या धाडसी निर्णयाचे तालुक्यात कौतुक होत आहे. यावेळी संचालक भगवान कातोरे, माजी उपसरपंच बाणेश्वर मालुंजकर, चंदू कोठुळे, अनिल टिळे, प्रमोद थोरात, संपत मुतडक, कैलास राऊत आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यात राजिनाम्याचे सत्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group