इगतपुरीनामा न्यूज – मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी,परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली. प्रगतशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे ( वय ७९ ) यांच्या अंत्यविधीवेळी पुरुष खांदेकरी ऐवजी सून जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, अनिता भदाणे, मुलगी जागृती सोनवणे, पुतणी डॉ. रोहिणी शिंदे, कृषि पर्यवेक्षक प्रियंका पाटील, नलिनी पाटील यांच्यासह बहिणी सिंधूबाई पवार, चित्राबाई सोनवणे, आशाबाई शिंदे, निर्मला सूर्यवंशी या महिला खांदेकरी झाल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. वसंतराव भदाणे हे बोरकुंड येथील डॉ. राजेश पाटील यांचे बंधू, मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भदाणे यांचे वडील व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व अनिता भदाणे यांचे सासरे होते. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य सुलभा कुवर, जिल्हाध्यक्ष नूतन पाटील यांनी यावेळी विधवा महिलांचे सौभाग्य अर्पण करून बांगड्या फोडून, कुंकू पुसून अपमान केला जात असल्याचे सांगितले. अशा चुकीच्या रुढी परंपरा बंद करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करूया असे त्या म्हणाल्या. भदाणे कुटुंब आणि गावकऱ्यांनी सर्वानुमते या चांगल्या उपक्रमास प्रतिसाद दिला. कोणतेही कर्मकांड कालबाह्य रूढी परंपरा न करता पत्नी लता भदाणे यांच्या हस्ते पूजन करुन जिजाऊ वंदनेने अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. बोरकुंड येथे रविवारी १७ सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात मरण आणि तोरण प्रसंगातील चुकीच्या प्रथा या विषयावर व्याख्यान, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरवसन्मान आणि वृक्षारोपण होणार आहे.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, मराठा सेवा संघ नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, धुळे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश सहसचिव चंद्रशेखर भदाणे, माजी जिल्हाध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले, जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष इंजि. नितीन पाटील, खजिनदार चंद्रशेखर पाटील, सदस्य स्वप्निल कोठारकर, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, मराठा आरोग्य कक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विशाल देसले, उपाध्यक्ष ॲड. माधव मुधाळे, सरचिटणीस उल्हास बोरसे, उदय बोरसे, अमित पवार, वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शिक्षक कक्ष जिल्हाध्यक्ष बी. ए. पाटील, शिवव्याख्याते प्रा. सदाशिव सूर्यवंशी, भाजपा नेते राम भदाणे, पंचायत समिती माजी सभापती प्रभाकर भदाणे, माजी उपसभापती देवीदास माळी, उपसभापती बाबासाहेब देवेंद्र माळी, सरपंच सुनीता हेमंत भदाणे, उपसरपंच संजय माळी, रतनपुरा सरपंच दगडू माळी, माजी उपसरपंच भरत भदाणे, विनोद भदाणे, भरत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते ए. पी. नाना पाटील, सतीश भदाणे, प्रा. अरुण शिंदे, डॉ. अतुल शिंदे, डॉ. संजय शिंदे, सोसायटी चेअरमन अनिल भदाणे, माजी सरपंच सुनिल चौधरी, माजी उपसरपंच रुपाली भरत भदाणे, विनोद भदाणे, शिवाजी महाले, रेस्क्यू आउटरीच संस्थेचे अध्यक्ष मधुकर सूर्यवंशी, सचिव सुनंदा सूर्यवंशी, संचालक हुकुमचंद पाटील, अधीक्षक अभियंता इंजि. यशवंत भदाणे, निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि.शांताराम भदाणे, तहसीलदार पंकज पाटील, मराठी पत्रकार संघाचे भास्कर सोनवणे, वाल्मीक गवांदे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शामकांत भदाणे, प्रवीण भदाणे, भरत भदाणे, भरत शिंपी, मुकेश भदाणे, डॉ. रविंद्र डांगचे, हिरालाल भदाणे, बाबूलाल भदाणे, निलेश वर्मा, प्रा. प्रशांत भदाणे, भगवान साळुंखे, लोटन भदाणे, शालिग्राम भदाणे, धनराज पाटील, हितेश पारीख, सुनिल भदाणे, जितेंद्र जैन, दादाभाऊ लोखंडे, नामदेव माळी, ज्ञानेश्वर माळी, इंजि. सुधीर रोकडे, चेतन पाटील, प्रशांत पाचपुते, धनराज पाटील, भटू भदाणे, विलास पवार, स्वप्निल भदाणे, यश भदाणे यांनी परिश्रम घेतले.
अंधश्रद्धा ,अनिष्ठ रूढी, परंपरा यामुळे मरण आणि तोरण प्रसंगी समाजाचे प्रचंड नुकसान होते. लग्न वेळेवर न लागणे, दारू पिवून नाचणे, प्री -वेडिंग यामुळे अनुचित घटना घडतात. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर विटंबना, खच्चीकरण व अपमान होतो. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या चुकीच्या रूढी परंपरा बंद कराव्यात. महिलांचा सन्मान करावा यासाठी समाजानेही पुढे यावे.
- ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ
कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे असते. समाजात बदल घडवायचं असेल तर महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. सासरे वसंतराव भदाणे यांच्या अंत्यविधी प्रसंगी कोणतेही कर्मकांड, चुकीच्या परंपरा न करता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून व विधवा महिलांचा सन्मान करत अंत्ययात्रा झाली. यासाठी भदाणे परिवार व गावकऱ्यांनी दिलेली साथ निश्चित मोलाची आहे.
- माधुरी भदाणे प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र