इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो येथे बँक ऑफ बडोदाच्या विविध सेवा देण्यासाठी बीसी सर्व्हिस पॉईंटचे उदघाटन आज संपन्न झाले. ह्या सेवा केंद्रात खातेधारकांना १० हजारापर्यंत पैसे टाकणे व काढणे, बँकेचे नवीन खाते उघडणे, पेन्शनची रक्कम काढणे, पासबुक प्रिंट करणे, सुकन्या योजना आणि इतर बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरता येणार आहेत. बँकेच्या विविध कर्ज योजनेसाठी सुद्धा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न घेता बँकेचे व्यवहार केले जातील. पिंप्री सदो येथे जावेद किराणा स्टोअर्स येथे बीसी सर्व्हिस पॉईंट कार्यान्वित झाले असून नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे उदघाटक बँक ऑफ बडोदा इगतपुरीचे शाखा व्यवस्थापक प्रशांत संधान यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून कपिल भारती, पोलीस पाटील रमेश पाटेकर, ग्रामसेवक गुलाब साळवे उपस्थित होते. बीसी सेंटरचे संचालक अर्शद अमजद पटेल, समीर जावेद पटेल यांनी लोकांना विविध सुविधा देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे यांनी केले. यावेळी बबलू उबाळे, प्रकाश उबाळे, शफी पटेल, फिरोज शेख, आसिफ पटेल, रामदास वाकचौरे, कोंडाजी उबाळे, संदीप उबाळे, पुना हंबीर, कुंडलिक पाटेकर, अमोल उबाळे, जाकीर शेख, मुख्तार पटेल, अय्याज पठाण, इफ्तेखार पटेल, वसीम शेख, जावेद शेख, मन्सूर पठाण, भावलीचे पोलीस पाटील जगन्नाथ अगविले, मानवेढेचे सरपंच मनोहर वीर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group