इगतपुरीनामा न्यूज – गडगडसांगवी जिल्हा परिषद शाळेत इगतपुरीचे पहिले आमदार कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. पुंजाबाबा गोवर्धने यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तके शाळेला भेट दिले. पुंजाबाबांचा वारसा व आपली सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी या फाउंडेशनमार्फत आदिवासी समाजातील गरजू, गरीब व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने या महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी बाबांच्या स्नुषा तथा पुंजाबाबा यांच्या जीवनचरित्र पुस्तकाच्या लेखिका सुमनताई हुकमतराव गोवर्धने होत्या. केंद्रप्रमुख विलास वाजे यांनी सर्वांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गोवर्धने कुटुंबीय व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सतिष गोवर्धने यांनी पुंजाबाबा गोवर्धने व लढवय्या फाउंडेशनच्या कार्यावर प्रकाश टाकून कार्यक्रमाचा उद्देश प्रकट केला.
सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गोवर्धने यांनी पुंजाबाबांनी उभारलेल्या भात लढ्याचा संपूर्ण इतिहास कथन केला. मुरंबीचे माजी सरपंच गोविंद मते यांनीही पुंजाबाबांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुमनताई गोवर्धने यांनी विद्यार्थ्यांना पुंजाबाबाच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी गोवर्धने कुटुंबातील उत्तमराव गोवर्धने, सतिष गोवर्धने, अनिल गोवर्धने, प्रशांत गोवर्धने, सुधीर गोवर्धने, चि. पुष्कर प्रशांत गोवर्धने, उर्मिला सतिष गोवर्धने, वैशाली प्रशांत गोवर्धने, उज्वला सुधीर गोवर्धने हे सदस्य उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते मनोज मते, पोलीस पाटील ललिता शिंदे, कृषी सहाय्यक संगीता जाधव,शिक्षक रामदास शिंदे, ग्रामपंचायत सदस्या मनिषा पाडेकर, अंगणवाडी सेविका सौ. माळोदे, राजुबाई शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रतन शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तळपाडे, खंडू बेंडकोळी, शंकर मोरे, सदस्य समाधान भोई, समाधान पाडेकर, गणेश नाठे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रतिभा सातपुते यांनी लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन व उपस्थितांचे आभार मानले.