इगतपुरीनामा न्यूज – पंढरीच्या विठूरायाचे आणि आषाढी एकादशीचे महत्व शाळेतील चिमुकल्यांना कळावे म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम विठ्ठलाची पूजा करून आरती करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शाळेत आले. सोबतच तुळशी वृंदावन आणले गेले. टाळ्या आणि टाळांच्या गजरात विठू नामाचा जयघोष करण्यात आला. रिंगण करून फुगड्या खेळल्या गेल्या. ही शाळा इंग्रजी माध्यमातील असून सुद्धा महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जोपासल्या जातात. दिंडीमध्ये अनवाणी चालताना मातीशी आपल नातं जपावं तसेच आमचा शेतकरी राजा मातीत चिखलात कसा देह झिजवतो याची विद्यार्थ्यांना जाणीव करुन देण्यात आली. असे कष्टकरी वारकरी जेव्हा वारीला जातात त्या वारकऱ्यांची श्रद्धा, निष्ठा आणि समाधान या निमित्ताने विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group