इगतपुरीनामा न्यूज – गोरगरीब ग्रामस्थांसाठी घरकुले देण्यासाठी शासन अविरत प्रयत्न करीत असतांना काही शासकीय लोकसेवक लोकांकडून लाच मागून त्रास देतात. इगतपुरी तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकही याला अपवाद नाही. रमाई घरकुल योजनेचा प्रस्ताव देऊन घराची मंजुरी आणली म्हणून त्याने ५ हजाराची मागितलेली लाच त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. घरकुलाला मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात एका तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अधरवड ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हंसराज श्रावण बंजारा वय ५२ ह्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून रंगेहाथ जेरबंद केले. घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी आणून देऊन घरकुलाचे शासकीय हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर जमा करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच ग्रामसेवक हंसराज बंजारा याने स्वीकारली. म्हणून त्याच्या यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, नितिन कराड, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group