लेखन : लक्ष्मण सोनवणे, पत्रकार
इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आमदार हिरामण भिकाजी खोसकर यांना पाहिल्यावर आमदार असा असावा असे वाटल्याशिवाय रहात नाही. त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांची चांगली जाण असल्याने सामान्य माणसाचा आशिर्वाद त्यांच्याकडे उदंड प्रमाणात आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रखरतेने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यासह जिल्हाभरात त्यांना आरोग्यदूत म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या जिल्हा रुग्णालय आणि अन्य विविध रुग्णालयांत गोरगरीब रुग्णांना मदत करण्यात ते कायमच अग्रेसर आहेत. असाध्य आजारपण अथवा कुठेही अपघात झाल्यास ते तातडीने मदत मिळवुन देतात. स्वतः संबंधित रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट आणि संवाद साधून त्याच्या अडचणी त्यांच्याकडून सोडवल्या जातात. साधी राहणी आणि उच्च विचार असल्याने मतदारसंघातील कोणत्याही कुटुंबात त्यांचा मुक्तप्रवेश असतो. निगर्वी स्वरूपाचे सर्वसामान्य आमदार म्हणून ते संपूर्ण राज्याला परिचित आहेत. निवडून आल्यापासून सातत्याने लोकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून त्यांनी विकासाचा मोठा आलेख उभा केलेला आहे. म्हणूनच आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरवर्षी अवकाळी कळतंय गुडघाभर चिखलातही पायी चालत पाहणी करणारे आमदार फक्त हिरामण खोसकर हेच आहेत. कोणताही बडेजाव न करता कीर्तनातही रमणारा हा आमदार वारकऱ्यांचाही लाडका आमदार आहे. दुर्लक्षित आदिवासी घटकांसाठी असह्य जीवन सुसह्य करण्यासाठी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर कायमच आघाडीवर आहेत. रस्ते, इमारती, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन आणि महत्वाच्या ग्रामीण पाणीपुरवठ्यासह विविध योजना राबवून त्यांनी तालुक्यातील धरणग्रस्तांचेही प्रश्न सोडवले आहेत. आरोग्यदूत असणारे आमदार हिरामण खोसकर ह्यांच्या दिनक्रमात आदिवासी विकास भवन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालय भेटी देऊन कामांचा पाठपुरावा महत्वाचा ठरतो. हा त्यांचा नित्यनियम असून इतर समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयात नागरिकांची तुडुंब गर्दी भरलेली असते. दिव्यांगांचेही प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. दांडगा जनसंपर्क, दिर्घ राजकीय अनुभव व धुरंदर राजकीय व्यक्तीमत्व असलेले आमदार हिरामण खोसकर यांनी मतदारसंघात अभूतपूर्व विकासकामे केली आहेत. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा कायापालट होणार आहे यात शंका नाही. विकासाला दिशा देणारे हे बहूआयामी नेतृत्व आमदार हिरामण भिकाजी खोसकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने उदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा !